महाराष्ट्र

maharashtra

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली; लवकरच पन्नाशी गाठण्याची शक्यता

By

Published : Apr 13, 2020, 4:38 PM IST

शहरात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा ४९ पर्यंत गेला असून दुर्दैवाने लवकरच पन्नाशी पार करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या नावात घोळ झाल्याने जिल्ह्यात नेमके कोरोनाबाधित रुग्ण किती, या संदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

corona nagpur
जिल्हा रुग्णालय

नागपूर- शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारच्या सत्रात आणखी ५ रुगणांचा कोरोना चाचाणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ पर्यंत गेली आहे. पाचही कोरोनाबाधित रुग्णांचे मरकजशी संबंध आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात दर दिवसाला एक ते दोन रुग्णांची भर पडायची. मात्र, जेव्हापासून मरकज येथून शहरात आलेल्या १३७ लोकांचे स्वॅब तपासले जाऊ लागले आहेत, तेव्हापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा ४९ पर्यंत गेला असून दुर्दैवाने लवकरच पन्नाशी पार करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या नावात घोळ झाल्याने जिल्ह्यात नेमके कोरोनाबाधित रुग्ण किती, या संदर्भात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा-चिंताजनक..! नागपुरात एकाच दिवशी 14 जण पाॅझिटिव्ह; एकूण आकडा 41वर..

ABOUT THE AUTHOR

...view details