महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर - नागपूर कोरोनामुक्त दर न्यूज

नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पुन्हा ८० टक्के झाले आहे. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात २१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ४७३ इतका झाला आहे.

Nagpur District Hospital
नागपूर जिल्हा रुग्णालय

By

Published : Jun 30, 2020, 1:39 PM IST

नागपूर - सोमवारी उपराजधानी नागपुरात २१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ४७३ इतका झाला आहे. मात्र, नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८० टक्के झाले आहे. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची सोमवारी परत कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी दिवसभरात ३४ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार १७१ इतकी झाली आहे. नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडा ५२ वर गेला आहे. सध्या नागपुरात २७७ अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय, एम्स आणि कामठीच्या मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढही होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. अनलॉक-१ प्रमाणेच अनलॉक-२ मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details