नागपूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (शुक्रवारी) 151वी जयंती आहे. यानिमित्ताने प्रत्येक भारतीयांना आपल्या-आपल्यापरीने आदरांजली अर्पण करत आहे. नागपूर येथील महामेट्रोकडून गांधी जयंती निमित्ताने विशेष आयोजन करण्यात आले आहे. याकडे नागपूरकरांचे लक्ष वेधले गेले आहे.
महात्म्याचे अनोखे स्मरण : नागपूर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन बनले 'बापू कुटी'! - airport metro station nagpur
महामेट्रोच्या वतीने नागपूर येथील वर्धा मार्गावर असलेल्या एअरपोर्ट मेट्रो स्टेशन परिसरात सेवाग्राम (वर्धा) येथील बापू कुटीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. सुमारे 15 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही बापू कुटी तयार झाली आहे.
![महात्म्याचे अनोखे स्मरण : नागपूर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन बनले 'बापू कुटी'! bapu kuti, nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9024690-860-9024690-1601640673452.jpg)
महामेट्रोच्या वतीने नागपूर येथील वर्धा मार्गावर असलेल्या एअरपोर्ट मेट्रो स्टेशन परिसरात सेवाग्राम (वर्धा) येथील बापू कुटीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. सुमारे 15 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बापू कुटी तयार झाली आहे. बापू कुटीची संकल्पना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची आहे. महामेट्रोच्या वतीने एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर बापू कुटी साकारून 151व्या जयंती निमित्ताने महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित 'स्वच्छता ही सेवा' हा दिन भारतात पाळण्यात आला.