नागपूर -राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या संविधान चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया जनतेची मुस्कटदाबी करू शकत नाही -
संविधानामुळेच आपल्या देशाला ताकत मिळाली आहे. ज्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकांना समान हक्क मिळाले आहेत. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्याचा विचार करत प्रत्येक बारीक सारीक घडणाऱ्या घटनांसाठी कायदा तयार केला. ज्यामुळे कितीही बलवान राज्यकर्ते असले, तरी ते सामान्य जनतेची मुस्कटदाबी करू शकत नसल्याचे म्हणत राज्यसरकारवर अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी -
२०१४पासून आपल्या देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी सार्वजनिक संविधान वाचनाचे अनेक कार्यक्रम शहरात आयोजित केले जातात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले नसल्याने सामान्य नागरिकांनी बाबासाहेबांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली होती.
हेही वाचा- 'देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा अपेक्षेहून अधिक'