नागपूर - अखिल भारतीय किसान संयुक्त मोर्चाच्यावतीने यवतमाळ येथे शेतकरी नेते राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात महापंचायत सभा होणार होती. सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द झाला असल्याचे बोलले जात होते. पण यामागे षडयंत्र असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्च्याचे महाराष्ट्र संयोजक संदीप गिड्डे पाटील यांनी ईटीव्हीशी बोलताना केला आहे.
शेतकरी महापंचायत रद्द होण्यामागे षडयंत्र- संदीप गिड्डे
यवतमाळ येथे महापंचायात सभेला मोठी गर्दी होणार होती. पंजाब हरियाणा यासह काही राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी महापंचायतला येणार होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सभेला परवानगी नाकारली.
फेक कॉलची चौकशी झाली पाहिजे होती
हा जो फेक कॉल करण्यात आला त्याची चौकशी झाली पाहिजे. हे आंदोलन मर्यादित राज्यात आहे, असे दाखवण्याच्या प्रयत्न सुरुवातीपासून केला जात आहे. टिकैत यांचे विमान रद्द का केले, कोण्याच्या सांगण्यावरून करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत किसान मोर्चाचे केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणाची महाराष्ट्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महापंचायत रद्द पण आज काय कार्यक्रम
बुट्टीबोरी येथे पंजाब हरियाणा, टीकरी गाझिपूर, सिंधू बॉर्डरचे लोक आले आहेत. महापंचायतसाठी येणाऱ्या राकेश टीकैत यांच्या स्वागताची तयारी केली असल्याचे संदीप गिड्डे आणि श्रीकांत तराळ यांनी सांगितले. टीकैत यांचा पुढील महिन्यात नागपूर ते औरंगाबाद, काश्मीर ते कन्याकुमारी असा पाच दिवसांचा दौरा आहे. यादरम्यान टीकैत हिंगणघाटला येणार असल्याचेसुद्धा श्रीकांत तराळ यांनी यावेळी सांगितले.