महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने नागपूरला दिलासा - Corona patient number Nagpur

नवीन आठवड्याची सुरवात उपराजधानी नागपूरच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक झाली. गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद आज झाली. गेल्या २४ तासांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात २ हजार ५३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ६ हजार ६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे, अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१ हजार १४३ राहिली.

Covid
कोविड

By

Published : May 10, 2021, 10:25 PM IST

नागपूर - नवीन आठवड्याची सुरवात उपराजधानी नागपूरच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक झाली. गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद आज झाली. गेल्या २४ तासांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात २ हजार ५३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ६ हजार ६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे, अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५१ हजार १४३ राहिली आहे. गेल्या आठवड्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ७५ हजारांच्या घरात गेली होती, मात्र रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने अ‌ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने खाली येत आहे आणि ही नागपूरच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक बाब म्हणावी लागेल.

हेही वाचा -कृषी मंत्र्यांनी घेतला खरीप हंगामाचा आढावा; शासनाकडून केले खताचे, बियाण्याचे नियोजन

आज ५१ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा आकडा देखील गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी राहिला आहे. नागपुरात एकूण मृतकांची संख्या ही ८ हजार १९२ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १५ हजार ३१० कोरोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये १४ हजार २२३ आरटीपीसीआर, तर १ हजार ८७ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. रुग्णसंख्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बघता नागपूरचा रिकव्हरी दर हा ८६.८६ टक्के इतका झाला आहे.

रुग्णसंख्येत ३० टक्यांनी घट

कोरोनामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण असताना आज नागपूरच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक आणि समाधानकारक बातमी पुढे आली. आज सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे, त्यामुळे नागपुरातील हजार अ‌ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सुद्धा चांगलीच घट नोंदवण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्याबाहेर गेल्याने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्या सरासरी ३० ते ३५ टक्यांनी घटत असल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आणखी कमी होऊन रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे.

हेही वाचा -नागपूर : मटणाचे दुकान लावण्याच्या वादातून व्यक्तीची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details