नागपूर - शहराला ऑरेंज सिटी वॉटर ( Orange City Water ) च्या माध्यमातून मनपाने 24/7 पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी प्रश्न पेटला आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही. नळ येतो आणि काही वेळात पाणी बंद होत आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात वंजारी नगर पाणी टाकीजवळ आंदोलन करण्यात आले. ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय यांच्या अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Nagpur Water Crisis : ओसीडब्ल्यूच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून काँग्रेसचे आंदोलन; अश्वासनानंतर आंदोलन मागे - नागपुरात पाणी टंचाई
नागरिकांना पाणी मिळत नाही. नळ येतो आणि काही वेळात पाणी बंद होत आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात वंजारी नगर पाणी टाकीजवळ आंदोलन करण्यात आले. ओसीडब्ल्यूचे सीईओ संजय रॉय यांच्या अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सोमवारपर्यंत अडचणी दूर होणार - भाजपाच्या काळात सुरू झालेल्या ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून पाणी पुरवठा न करता टँकरच्या माध्यमातून पाणी देऊन लाखोंचे बिल काढण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा नावावर भष्ट्राचार सुरू असल्याचाही आरोप काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांनी केला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या मधात असलेल्या ऑफिसवर चढून हातात बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. ओसीडब्ल्यू पाणी देत नाही मात्र बिल देत आहे, असाही आरोप करण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी मुख्य कार्यकारी अधिकरी ( सीईओ ) संजय रॉय यांनी कॉंग्रेस नेते गिरीश पांडव यांच्याशी चर्चा करून तक्रार समजून घेतली. तसेच ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागातील अडचणी सोमवारपर्यंत दूर करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे गिरीश पांडव यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.