महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पश्चिम नागपूरमधून काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा अर्ज दाखल, चतुर्वेदींसह राऊत, मुळकही गैरहजर - विकास ठाकरे

ढोल-ताशांच्या गजरात विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, चतुर्वेदी, नितीन राऊत आणि मुळक सारखे नेते गैरहजर असल्याने काँग्रेसमध्ये मानाची लढाई पुन्हा जोर धरत असल्याचे चित्र आहे.

शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे

By

Published : Oct 3, 2019, 6:36 PM IST

Updated : Oct 3, 2019, 9:10 PM IST

नागपूर- शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी पश्चिम नागपूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केला. मात्र, यावेळी देखील काँग्रेसची गटबाजी दिसून आली. ठाकरेंचा अर्ज सादर करताना माजी मंत्री विलास मुत्तेमवार उपस्थित होते. मात्र, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि राजेंद्र मुळक यांसारखे मोठे नेते गैरहजर होते.

पश्चिम नागपूरमधून काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा अर्ज दाखल

ढोल-ताशांच्या गजरात विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, चतुर्वेदी, नितीन राऊत आणि मुळक सारखे नेते गैरहजर असल्याने काँग्रेसमध्ये मानाची लढाई पुन्हा जोर धरत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात विकास ठाकरे यांना विचारले असता, सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसकडे उमेदवार नाहीत का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी ६ उमेदवार इच्छुक असल्याचा दावा विकास ठाकरे यांनी यावेळी केला.

Last Updated : Oct 3, 2019, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details