महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२०२३ मध्ये ते विधानसभा जिंकले तर आम्ही लोकसभा जिंकू- नाना पटोले - लोकसभा निवडणुकीविषयी नाना पटोलेंचे मत

Nana Patole On Loksabha Election : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यात भाजपाला विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळालं आहे. (Congress State President) मात्र, हे यश तात्पुरतं असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचं पानिपत होईल (Nana Patole) आणि काँग्रेस सत्तेच्या रथावर स्वार होईल, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. (Lok Sabha Election 2024) ते आज नागपूर येथे बोलत होते. २०१८ ला आम्ही विधानसभा जिंकलो ते लोकसभा जिंकले. २०२३ मध्ये ते विधानसभा जिंकले तर आम्ही लोकसभा जिंकू असेही ते म्हणाले.

Nana Patole On Loksabha Election
नाना पटोले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 9:00 PM IST

आगामी लोकसभा निवडणुकीविषयी नाना पटोले यांचे मत

नागपूर Nana Patole On Loksabha Election :2018 साली भाजपाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश प्राप्त झालं होतं. तसंच काँग्रेसच्या बाबतीत घडेल आणि येत्या लोकसभा निवडणुकीत आमची सत्ता स्थापन होईल असं भाकीत नाना पटोले यांनी केलं. (Maharashtra Assembly Election)

'इंडिया' आघाडीत आमचं वजन कमी नाही:विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तीन राज्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानं 'इंडिया' आघाडीत आता काँग्रेसचं वजन कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण आमचा पक्ष तडजोड करणारा नाही. सर्वांना सोबत घेऊन चालायचं हेचं आम्हाला शिकवण्यात आलंय. भ्रष्टाचाराने निवडणूक आलेल्या लोकांची हीच मानसिकता असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.


शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचाच विजय:२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी चर्चा आता भाजपाच्या नेत्यांनी सुरू केली आहे. यावर नाना पटोले म्हणाले की शाहू, फुले, आंबेडकरी विचाराला तडा देत विभाजनाचं राजकारण भाजपा करत आहे. ते आतापासूनच भाजपचं सरकार येईल, वानखडेवर शपथ घेऊ असं जर म्हणत आहेत तर हा महाराष्ट्र आहे. त्यांनी महाराष्ट्राचा अजून वैचारिक विचार केलेला नाही. त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला लुटायची आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचाच विजय होईल.

यामध्ये काहीही तथ्य नाही:पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील वर्षभरापासून ही चर्चा ऐकत आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.

भाजपच्या घोषणा जुमले ठरू नये:राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपाचे किती वाद होते हे तुम्ही चॅनलवर दाखवत होते. हरल्यानंतर अशा अफवा कुणीही उडवू नका. या विषयावरील वाद-विवादात तुम्ही पडू नका. भाजपाने ज्या-ज्या घोषणा केल्या ते जुमले ठरू नये, एवढंच आमचं मत आहे. जनमताचा, कौलाचा आम्ही आदर केला आहे. या ज्या काही चुका झाल्या त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.


संजय राऊत म्हटल्यानं निवडणुका घेणार नाहीत:भाजपाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्या, असं आवाहन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांच्या म्हटल्यानं निवडणुका लागणार नाहीत. महाराष्ट्र राज्य डेंगूच्या आजारानं फणफणत आहे. कल्याणमध्ये एका बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला. याची लाज सरकारला वाटत नसेल आणि विजयाचा आनंद साजरा करत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आनंद व्यक्त करण्यावर आम्ही काही प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही.

हेही वाचा:

  1. नौदल दिनानिमित्त मोदी सिंधुदुर्गात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण
  2. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; ललित पाटीलला मदत करणाऱ्या कारागृह मेडिकल ऑफिसरला अटक
  3. धुळे-मुंबई एक्सप्रेस इंजिन कसारा-वशिंद दरम्यान फेल; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड त्रास

ABOUT THE AUTHOR

...view details