नागपूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात केलेल्या आरोपानंतर राज्यात माहाविकास आघाडीत वाद असल्याची चर्चा सुरू आहे. यावर मात्र नाना पटोलेंनी सोमवारी (दि. 12 जुलै) बाजू सावरत भाजप प्रसार माध्यमांधून चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय काँग्रेसच्या मेळाव्यातील वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलताना म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. यावेळी बोलताना काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याचा भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे आयबीच्या माध्यमातून पाळत ठेवत असल्याचे ते म्हणाले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
आमच्यात वाद नाही हे सरकार 5 वर्षे टिकेल
यावेळी नाना पटोले म्हणाले, मी पक्षाची भूमिका मांडत महाराष्ट्रात फिरत आहे. काँग्रेस-भाजप विरोधात आहे. यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने चुकीच्या बातम्या पेरल्या जात असल्याचे नाना म्हणाले. माहाविकास आघाडीमध्ये एकमातने काम सुरू आहे. आयबीची दैनंदिन पद्धत आहे. घडामोडींची माहिती राज्यालाच नाही तर केंद्राही जात असते. हे नियमित प्रक्रिया असल्याने याला वादग्रस्त म्हणायला काही कारण नाही, असे म्हणत लोणावळ्यातील वक्तव्यावर पटोले यांनी सारवासारव केली. यावेळी अजित पवारांच्या नाराजीवर पटोले म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून चर्चा करू कोणी वाद निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असले तर चर्चेने प्रश्न सुटतात, असे काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आमच्यात वाद नाही. पाच वर्षे सत्ता टिकेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
भाजप अपयशी ठरल्याने चुकीच्या बातम्या पसरवत आहे