नागपूर -उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेचे पडसाद देशभरात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील सक्करदरा चौकात युवक कॉंग्रेसकडून घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटो बॅनरला चपला मारून घटनेचा निषेध करण्यात आला.
लखीमपूर खीरी प्रकरण : उपराजधानीत कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध - योगी आदित्यनाथ यांच्या फोटो बॅनर जाळले
उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा विरोधात आंदोलन सुरू होते. मागील अनेक दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेले आंदोलनाला उत्तर प्रदेशमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आंदोलन सरकारला थोपवता आले नसल्याने हा नरसंहार घडल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. या विरोधात युवक काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. या विरोधात नागपूरच्या सक्करदरा चौकात काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
![लखीमपूर खीरी प्रकरण : उपराजधानीत कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13259537-1080-13259537-1633356158385.jpg)
आंदोलन
उपराजधानीत कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध
Last Updated : Oct 4, 2021, 7:50 PM IST