महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाला भकास करण्याचे काम मोदी सरकारने केले; नागपूरात काँग्रेसचे आंदोलन - नागपूरात काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देवडिया भवनासमोर हातात फलक घेऊन आंदोलन केले. यावेळी नोटबंदी, वाढती महागाई, यासोबत ढासळलेली अर्थव्यवस्था, देशात वाढती बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदे या विषयांना धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली.

Congress protests against seven years of Modi government in nagpur
नागपूरात काँग्रेसचे आंदोलन

By

Published : May 30, 2021, 2:26 PM IST

नागपूर -नागपुर शहर काँग्रेस कमिटीच्या देवडिया भवनासमोर मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. देशाला भकास करण्याचे काम मोदी सरकारने केले म्हणत आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. यात नागपूरात आमदार विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नागपूरात काँग्रेसचे आंदोलन

हातात फलक घेऊन केले आंदोलन -

यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देवडिया भवनासमोर हातात फलक घेऊन आंदोलन केले. यावेळी नोटबंदी, वाढती महागाई, यासोबत ढासळलेली अर्थव्यवस्था, देशात वाढती बेरोजगारी, शेतकरी विरोधी कायदे या विषयांना धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली.

सरकारविरोधात केली घोषणाबाजी -

यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात अनेक शासकीय कंपन्या खाजगीकारण होत असल्याने त्यांनाही विरोधात करण्यात आला. मोदी सरकारने सात वर्षात देश विकायला काढला म्हणत घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - निवडणुका जिंकण्यासाठी वापरलेले 'टुलकीट' आता भाजपावर उलटले - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details