नागपूर: रिझर्व बँकेने २ हजाराच्या नोटा सप्टेंबरनंतर चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या पैशाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात असले तरी या मुद्द्यावर सुद्धा राजकारण तापले आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या नोटबंदी कुठल्या उद्देशाने केली हे लक्षात घेतले पाहिजे. केंद्र सरकारच्या जवळ असलेल्या उद्योगपती मित्रांना फायदा व्हावा याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटबंदी: ज्या नोटा चालनात आलेल्या होत्या, त्या आठ लक्ष कोटी इतक्या होत्या. म्हणजे प्रत्यक्षात व्यवहारामध्ये आणि चलनामध्ये 10 टक्के दोन हजाराच्या नोटा होत्या. अशा परिस्थितीमध्ये या नोटा गेल्या कुठे, कुठे डम्प झाल्यात तर सगळ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरच्या लोकांनी या नोटा डम्प केल्या आहेत, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नोटबंदी केली असावी. सामान्य माणसाकडे दोन हजारांच्या नोटा नाही. मार्केटमध्ये या नोटा दिसत नाही, त्या गायब झालेल्या आहेत. या नोटा विशिष्ट लोकांनी गोळा करून ठेवलेल्या आहे. आता त्या नोटा को-ऑपरेटिव्ह बँके आणि पतसंस्थेच्या माध्यमातून नोटा वाईट केल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
मित्रमंडळीना खुश करण्यासाठी निर्णय: नोटबंदीचा फायदा थेट सरकारच्या जवळच्या लोकांना होईल. अशा प्रकारचे प्रयोजन करून नोटबंदीचा निर्णय केला असावा असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. नोटबंदीचे सामान्य लोकांची काही देणंघेणं राहिलेल नाही. कारण त्याच्याकडे ह्या नोटा अजिबात शिल्लक नाही. केवळ सरकारच्या मित्रमंडळीना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले आहे.