नागपूर - मुख्यमंत्र्यांनी २०१५ ला महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याच आश्वासन दिले होते. मात्र राज्याची भीषण पाणीटंचाई बघता मुख्यमंत्री टँकरयुक्त राज्य केल्याची टीका राज्याचे विधिमंडळ उपनेता विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पश्चिम विदर्भाच्या जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केल्यानंतर पूर्व विदर्भातील दुष्काळी भागाचा आढावा काँग्रेसचे आमदार घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी टँकरमुक्त नाही तर टँकरयुक्त महाराष्ट्र बनवलं - वडेट्टीवार - droughts
पाण्यासाठी लोकांना मेलोनमैल भटकंती करावी लागत आहेत. बुलडाण्यापासून सुरू झालेल्या दुष्काळी दौऱ्याची सांगता नागपुरात झाली.
राज्यातील अनेक भागात दुष्काळ आहे, मुक्या जनवारांना पिण्यासाठी पाणी आणि खायला चारादेखील उपलब्ध नाही. पाण्यासाठी लोकांना मेलोनमैल भटकंती करावी लागत आहेत. बुलडाण्यापासून सुरू झालेल्या दुष्काळी दौऱ्याची सांगता नागपुरात झाली. या आढावा दौऱ्यात पाणीटंचाई जनवारांना चारा मिळत नसून, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्काळ मदत निधीच उपलब्ध नासल्याचे घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी टंचाई निवारणासाठी अनेक उपाय योजनांचा आराखडा आखला, मात्र त्याची प्रत्यक्ष आंबलबजवणी होत नसून, कोरडी आश्वासन राज्य सरकार देत असल्याचे आरोप विजय वडडेट्टीवार यांनी केला आहे.