नागपूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होणारी चौकशी आणि पी. चिदंबरम यांना झालेली अटक, या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबतच असे घडत असून याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असे मत व्यक्त करत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या नागपुरातील काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबतच 'असे' घडतंय - उर्मिला - inc
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होणारी चौकशी आणि पी. चिदंबरम यांना झालेली अटक, या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबतच असे घडत असून याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असे मत व्यक्त करत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
उर्मिला मातोंडकर
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या कार्यकाळावर आताचे सरकार सातत्याने टीका करत आहे. यासाठी युवा काँग्रेसतर्फे नाटकाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी उर्मिला मातोंडकर नागपुरात दाखल झाल्या आहेत.