महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sunil Kedar On Ajit Pawar : अजित पवारांना भाषण करू देणे न देणे हा राष्ट्रवादीचा निर्णय - सुनिल केदार - Ajit Pawar

अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी आपले मत मांडले आहे. अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Apr 18, 2023, 4:20 PM IST

सुनिल केदार

नागपूर :गेल्या बऱ्याच दिवसांपासूनराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात जातील असे चित्र निर्माण झाले होते. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास याचा महाविकास आघाडीवर विपरीत परिणाम होईल अशी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना होती. यावर कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी आपले मत मांडले आहे. अजित पवार संघर्ष करणारे नेते आहेत. त्यामुळे ते असं काही करतील असं मला वाटतं नसल्याचं काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले आहेत.

अजित पवारांचे मानले आभार : सुनील केदार हे नागपुरात झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेचे आयोजक होते. त्यांनीच अजित पवार यांना नागपुरच्या सभेत येण्याची गळ घातली होती. 'वज्रमुठ सभेच्या संयोजक पदाची जबाबदारी असल्याने मविआतील सर्व नेत्यांना येण्याची विनंती करणे माझे कर्तव्य होते. माझ्या विनंतीला मान देत अजित पवार यांनी वज्रमुठ सभेला उपस्थिती लावली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो', असे सुनील केदार म्हणाले आहेत.

'हा राष्ट्रवादीचा निर्णय' :अजित पवार महाविकास आघाडीच्या सभेत येतील की नाही, हा प्रश्न पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला होता. ते येणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर ते काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं होतं. मात्र सभेत त्यांना भाषण करता आले नाही. मुळात भाषण न करण्याच्या अटीवरच अजित पवार सभेत सहभागी झाले होते, असे आता समोर आले आहे. अजित पवार यांनी भाषण देणं न देणे हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत निर्णय होता, असं मत सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे.

'आम्ही आमचा हिशोब मांडू' :मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र झाले तरी सरकार पडणार नाही, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. राज्यात सत्तांतर होऊन आता एक वर्ष होत आहे. या प्रकरणी लवकरच कोर्टात निकाल लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावर निकाल दिला आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी सरकार पडण्याची शक्यता नाही. भाजपकडे अपक्षांसह एकूण 115 आमदार आणि शिंदे गटाकडे 50 असे एकूण 165 आमदार आहेत. 16 आमदार अपात्र झाल्यावर 288 मधून 272 आमदार उरतील. म्हणजेच बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ भाजपकडे आहे. आपण ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. यावर बोलताना सुनील केदार म्हणाले की, 'राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार स्थिर आहे हे अजित पवार यांनी सरकार बद्दल आपले मत व्यक्त केले. तो त्यांचा हिशोब आहे. आम्ही आमचा हिशोब मांडू'.

हेही वाचा :Ajit Pawar BJP Alliance : माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details