नागपूर - गुजरातमध्ये निर्माण होणारे रेमडेसीवीर इंजेक्शन हे तेथील लोकांना मिळावे व दुसऱ्या राज्याला ते मिळू नये, अशा पद्धतीची भाजपची भूमिका माणुसकीला न शोभणारी आहे. यामुळे गुजरातमध्ये निर्माण होणारे हे इंजेक्शन भाजप कार्यालयाला पोहोचवले जाते. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचे राजकारण भाजप करत आहे. याचा निषेध करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, माणुसकी असती तर देश कोरोनामुक्त राहिला असता. ते नागपूरच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महापालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. लसीकरण झाले असते तर या महामारीला लढा देत आला असता. पण, लसीकरण न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. नागपुरात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, प्रशासनाने त्या पद्धतीने काम केले तर ही साखळी तोडण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
दोन दिवसांत टाळेबंदीबाबत निर्णय