मुंबई - बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे आज सकाळी नागपुरात सेमिनरी हिल ( Seminary Hill in Nagpur ) येथे मॉर्निंग वॉक करताना तोल जाऊन ( Balasaheb Thorat collapsed ) पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली ( Balasaheb Thorat shoulder injured ) आहे. दुखापत झाल्यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पडल्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच आपली तब्येत आता पूर्णपणे बरी असून कोणीही तब्येतीची काळजी करू नये असे आपल्या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
Balasaheb Thorat collapsed : मॉर्निंग वॉक करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोसळले; खांद्याला दुखापत - balasaheb thorat hospital admit
माजी महसुल मंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat) यांच्या खांद्याला दुखापत झाली ( Balasaheb Thorat shoulder injured ) आहे. आज सकाळी नागपुरात सेमिनरी हिल ( Seminary Hill in Nagpur ) येथे मॉर्निंग वॉक करताना त्यांचा तोल गेला ( Balasaheb Thorat collapsed ) होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (Balasaheb Thorat Hospital Admit) आहे.
पुढील उपचारासाठी थोरात विशेष विमानाने मुंबईत - नागपुरात रुग्णालयात प्रथमोपचार घेतल्यानंतर यापुढील उपचार मुंबईतील फॅमिली डॉक्टर कडून घेणार असल्यासही त्यांनी ट्विट मधून सांगितलं आहे. मुंबई पुढील उपचारासाठी बाळासाहेब थोरात हे विशेष विमानाने मुंबईत येणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजात बाळासाहेब थोरात हे सहभागी होऊ शकतील का? याबाबत अद्यापही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
विरोधक महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आक्रमक - मुंबईत आज सायंकाळी बाळासाहेब थोरात यांच्यावर उपचार होणार सुरू होतील. हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असून विरोधक महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन्ही सभागृहात तातडीने सीमावाद प्रकरणी ठराव संमत करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. तसेच विधानसभेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन विकल्याचा आरोप करत विरोधकांनी गदारोळ घातला आहे. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सभागृहात नसल्याने याचा फटका विरोधकांना बसण्याची शक्यता आहे.