नागपूर- आजचा दिवस (16 डिसेंबर) हा देशातील इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश या देशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवसाला भारतीय सैन्याचा गौरव करण्याऐवजी भाजपने सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपचा इतिहास बघितला तर, त्यांनी नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
'भाजपचा नेहमीच नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगावण्याचा प्रयत्न'
आजचा दिवस (16 डिसेंबर) हा देशातील इतिहासात महत्वाचा आहे. आजच्या दिवशीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश या देशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवसाला भारतीय सैन्याचा गौरव करण्याऐवजी भाजपने सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
हेही वाचा -राहुल गांधी जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही - देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी महाराष्ट्राच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. विरोधी पक्ष या विषयावर जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे. त्याचा उपयोग करून विनाकारण त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवून भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपने नेहमीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा इतिहास बघितला तर त्यांनी नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला असल्याचे चव्हाण म्हणाले.