नागपूर Congress Jan Samvad Yatra : भारतीय जनता पक्षाने देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आणलंय. त्यामुळं राज्यातील जनतेनं एकत्रित येऊन काँग्रेससोबत देश आणि संविधान वाचवायला पाहिजे, म्हणून ही यात्रा काढली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. भाजप मूठभर मित्रांसाठी सर्वसामान्यांना लुटत आहे.संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला जागं करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. जालन्यात मराठा समाज न्यायिक हक्कासाठी उपोषणाला बसलेला होता. मात्र, त्यांच्यावर सुद्धा या भाजपा सरकारनं लाठीमार केलाय. ही घटना मराठवाड्यात घडल्यामुळं मराठवाड्यातील पदयात्रा काही दिवस पुढे ढकलली असल्याचं त्यांनी सांगितलंय.
वणवा आम्ही विझवणार :जालन्याच्या घटनेमुळं पेटलेला वणवा विझवण्याचं काम आम्ही सर्व करणार आहोत. लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. ही पदयात्रा निवडणुकीसाठी आहे, असे म्हणता येणार नाही, असंही ते म्हणाले. तानाशाही प्रवृत्ती विरोधात ही यात्रा आहे. जनतेला तानाशाही वृत्तीच्या भयापासून मुक्त करण्याचं उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना हिम्मत देऊन जगण्याची उम्मीद निर्माण करण्यासाठी ही यात्रा आहे. (Congress Jan Samvad Yatra Nana Patole)
मराठा ओबीसीत भांडण लावण्याचा प्रयत्न :देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना अनेक खोटे आश्वासनं देण्यात आली होती. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण संदर्भात खोटी आश्वासनं दिली गेली होती. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून मागास जातींना आरक्षण देता येऊ शकते. केंद्र सरकारनं ते करावे. पण मोदी सरकारला ते करायचं नाही. उलट ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजेच मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे. (Jan Samvad Yatra)
पोलीस अधीक्षकांचा काय दोष :जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेत पोलीस अधिक्षकांचा काय दोष, असा सवाल त्यांनी केलाय. उलट सरकारनं त्यांना आदेश दिलेत म्हणून त्यांनी त्या आदेशाचं पालन केलंय. सरकारने सौम्य लाठीमार करण्याचा आदेश कसा काय दिला. पोलीस अधीक्षकांचे निलंबन नको तर सरकारने पायउतार व्हावे. एकाचं आरक्षण काढा आणि ते दुसऱ्याला द्या असं होऊ शकत नाही, त्यामुळं आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असंही पटोले म्हणाले. प्रफुल्ल पटेल संदर्भात काय बोलावं, आधी त्यांनी त्यांचे जे अनैतिक संबंध (भाजपासोबत) जोडले आहे त्याबद्दल बोलावं, असंही ते म्हणाले. (Vijay Wadettiwar)
हेही वाचा :
- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो-२ यात्रेचा ठरला मार्ग, वाचा कसा असेल झंझावात
- Bharat Jodo Yatra 2 : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच... राज्यातील सहा भागातून होणार पदयात्रा
- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा लवकरच, असा असेल मार्ग..