नागपूर- काँग्रेसकडून गिरीश पांडव यांना दक्षिण नागपूर मतदारसंघातून अनपेक्षितपणे उमेदवारी मिळाली. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, नाराज असलेले प्रमोद मानमोडे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे गिरीश पांडव यांची डोकेदुखी वाढली आहे.
दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अर्ज दाखल, मानमोडेमुळे डोकेदुखी - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव अशी लढत होती. मात्र, आता प्रमोद मानमोडे यांनी देखील अपक्ष अर्ज सादर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
काँग्रेस सत्तेत असताना नागपूरमध्ये मिहानसारखा प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार होते. मात्र, भाजपने या मिहानची प्रगतीच केली नसल्याचा आरोप गिरीश पांडव यांनी केला. जनतेचे प्रश्न सोडवताना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. काँग्रेसमध्ये कोणत्याच प्रकारची गटबाजी नसल्याचे देखीव गिरीश पांडव म्हणाले.
दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव अशी लढत होती. मात्र, आता प्रमोद मानमोडे यांनी देखील अपक्ष अर्ज सादर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.