नागपूर - विभागात होऊ घातलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध कॉंग्रेस असा थेट सामना रंगत आलेला आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांचे उमेदवार कोण असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारतीय जनता पक्षाकडून महापौर संदीप जोशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर, काँग्रेसने माजी मंत्री दिवंगत गोविंदराव वंजारी यांच्या मुलाला म्हणजेच अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. अभिजीत वंजारी गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या विजयाचा दावा सादर केला आहे
हेही वाचा -आम्हाला मदत देता का भीक? सरकारच्या मदतीवर शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
अभिजित वंजारी हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सुरवातीपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी याआधीही दक्षिण नागपूर येथून २०१४ साली विधानसभा निवडणुकीत लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाचे काम करणे सुरू ठेवले होते. २०१९ मध्ये निवडणूक लढण्यासाठी त्यांची तयारी होती. मात्र, त्यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. तेव्हापासूनच त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी पदवीधर कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केल्याचा दावा केला आहे. या मतदारसंघावर गेल्या पाच दशकापासून भाजपचा कब्जा असला तरी या वेळी आपण तो उद्ध्वस्त करणार असल्याचा दावा अभिजित वंजारी यांनी केला आहे.
काँग्रेसचे गट-तट यावेळी एकत्र दिसतील