नागपूर : नागपूरच्या अस्थिरोग विभागासमोर छोटी ऑक्सिजन पाईपलाईन बसवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मुख्य पाईपलाइनला धक्का लागल्याने ऑक्सिजन लिकेज झाल्याची घटना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये घडली (Pipeline leakage in Nagpur Medical College). ही घटना शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली आहे. वेळीच लक्षात आल्याने अनुचित प्रकार मात्र टळला, पण दुसरीकडे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळाले.
Oxygen pipeline leakage :मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन लिकेज झाल्याने गोंधळ - नागपूर मेडिकल कॉलेज
नागपूर मधील मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन लिकेज (Oxygen pipeline leakage in medical college) झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठी धावपळ करत या घटनेवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये छोटी ऑक्सिजनची पाईपलाईन बसवण्याच्या कामासाठी वेल्डिंग सुरू होते. याचदरम्यान भिंतीला लागून असलेल्या मोठ्या ऑक्सीजनच्या पाईप लाईनला धक्का लागल्याने ती लिकेज झाली. याच ऑक्सिजन लाईनवरून काही वॉर्डांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. ही घटना घडल्याने तात्काळ रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरच्या साह्याने ऑक्सिजनचा पुरवठा (Supply of oxygen with oxygen cylinder) करण्यात आला. त्यानंतर रुग्णांना ऑक्सिन उपलब्ध असलेल्या वार्डात हलवण्यात आले. यावेळी मात्र डॉक्टर आणि परिचारिकांचा काही काळ गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना मात्र टळली आहे.
हेही वाचा :Collarwali Tigress : कॉलरवाली सुपर मॉमने घेतला शेवटचा श्वास... व्याघ्र प्रेमी हळहळले
TAGGED:
नागपूर मेडिकल कॉलेज