महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अर्णब गोस्वामीविरुद्ध राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांची पोलिसात तक्रार - sunil kedar

हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक असलेले जेष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी राज्याचे मंत्री नितीन राऊत, सुनील केदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांनी केली अर्णब गोस्वामी विरोधात तक्रार
राज्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांनी केली अर्णब गोस्वामी विरोधात तक्रार

By

Published : Apr 23, 2020, 8:37 AM IST

नागपूर - पत्रकार व रिपब्लिक हिंदी वृत्तवाहिनीचे वृत्तवाचक असलेले जेष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात राज्याचे मंत्री नितीन राऊत, सुनील केदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. 'डिबेट शो'च्या माध्यमातून अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात गरळ ओकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे दाखल करण्यात आलेली तक्रार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे दाखल करण्यात आलेली तक्रार

'पूछता है भारत' या डिबेट शोचे सूत्रसंचालन करताना गोस्वामी यांनी पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्येसंदर्भांत चर्चा करताना अनेक वादग्रस्त मुद्यांना हात घालत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चूप का आहेत, इतर धर्मांच्या संतांची हत्या झाली असती तर त्या गप्पा राहिल्या असत्या का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details