नागपूर - गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे कडेकोट पालन करण्याचे आदेश देणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी स्वतःच नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मनीष मेश्राम नावाच्या व्यक्तीने ही तक्रार पोलिसांत दिली आहे.
गणेशपेठ पोलिसांत तुकाराम मुंढेंनी लॉकडाऊनचे नियम मोडल्याची तक्रार
31 मे रोजी गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील राजवाडा पॅलेसमधील कार्यक्रमात मुंढे सहभागी झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंढे यांच्या स्वागताचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात 200 लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा व्हिडीओ फेसबुक वर अपलोड करण्यात आला आहे. त्याच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
31 मे रोजी गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील राजवाडा पॅलेसमधील कार्यक्रमात मुंढे सहभागी झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंढे यांच्या स्वागताचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात 200 लोक सहभागी झाले होते. इतके लोक एका ठिकाणी आल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग फज्जा झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सोबतच, लॉकडाऊन असतानाही राजवाडा पॅलेस हे कार्यालय उघडून कार्यक्रम कसा घेण्यात आला, यावरही तक्रारीत आक्षेप घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा व्हिडीओ फेसबुकवर 31 मे रोजी अपलोड करण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने हा व्हिडिओ 4 मे रोजी बघितला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आता पोलीस या बाबतीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.