नागपूर - काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चुकीची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार
काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून तक्रार करण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी निवडणुकीपूर्वी नागपूरच्या काही स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही सुरू नसल्याबद्दल आरोप केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनकडे त्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. प्रशासनाने ते न दिल्यामुळे नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाचे निर्देश नसताना पटोलेंनी पोस्ट टाकून निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी चुकीची माहिती प्रसारित केल्याचे आक्षेप जिल्हा प्रशासनाने घेतले. चौकशीअंती जिल्हा प्रशासनाने नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार देत गुन्हा नोंदविला आहे.