नागपूर - प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात पालीचे मेलेले पिल्लू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यश अग्निहोत्री यांनी अन्न आणि औषधी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात तक्रारदार अग्निहोत्री कुटुंबीयांशी संपर्क केला असता त्यांनी आणि रुग्णालय प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
'हल्दीराम' प्रकरणी तक्रारदाराचा मीडियाशी बोलण्यास नकार, अन्न-औषधी प्रशासन विभागाचेही मौन - यश अग्निहोत्री
हल्दीराम प्रकरणात तक्रारदार अग्निहोत्री कुटुंबीयांनी आणि रुग्णालय प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
मंगळवारी अग्निहोत्री कुटुंबातील काही सदस्य नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये गेले असताना त्यांच्या खाद्य पदार्थामध्ये पालीचे मेलेले पिल्लू आढळून आले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात तक्रारदार असलेल्या दोघांशी संपर्क केला असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त नागपूर बाहेर असल्याने त्यांनीदेखील चौकशीचा अहवाल आल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही, असे सांगितले.