नागपूर - कोव्हिड काळात शासननियमांचे उल्लंघन करीत रुग्णाकडून तब्बल ६,८६,५२७ रुपये अधिकचे बिल आकारणाऱ्या सेव्हन स्टार रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनपाने केलेल्या तक्रारीनतंर भादंविच्या कलम १८८, २९० सह कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ कलम ५१, ५८, साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अव्वाच्या सव्वा बिल आकारणे भोवले; सेव्हन स्टार रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल - nagpur police news
कोव्हिड अथवा नॉन कोव्हिड रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांकडून रक्कम आकारण्याचे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन करीत सेव्हन स्टार रुग्णालयाने नॉन कोव्हिड रुग्णांकडून तब्बल ६,८६,५२७ रुपये अधिकचे बिल आकारले. त्यामुळे मनपाकडून साथरोग प्रतिबंधक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये सेव्हन स्टार रुग्णालयाविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापन व इतर सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोव्हिड अथवा नॉन कोव्हिड रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार रुग्णांकडून रक्कम आकारण्याचे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन करीत सेव्हन स्टार रुग्णालयाने नॉन कोव्हिड रुग्णांकडून तब्बल ६,८६,५२७ रुपये अधिकचे बिल आकारले. खासगी रुग्णालयांकडून शासनाच्या नियमांचे पालन योग्य प्रकारे होत आहे की नाही यासाठी नागपूर महानगरपालिकेने अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक कुठल्याही रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन त्याची पाहणी करतात. या तपासणी पथकाला सेव्हन स्टार रुग्णालयात अनियमितता आढळली. शिवाय कागदपत्रांची पाहणी केली असता नॉन कोव्हिड रुग्णांकडून अधिकची रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. याआधारे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी नोटीस पाठवून जाब विचारला होता. मात्र, त्याचेही समाधानकारक उत्तर रुग्णालय व्यवस्थापनाकडून न मिळाल्याने आयुक्तांनी १८ ऑगस्टला अतिरिक्त बिल तत्काळ परत देण्याचे आदेश दिले. तसेच, या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी न केल्यामुळे मनपाकडून साथरोग प्रतिबंधक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअन्वये सेव्हन स्टार रुग्णालयाविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी सेव्हन स्टार हॉस्पीटल व्यवस्थापन व इतर सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.