नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिक जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र दिसते. यावर उपाय म्हणून महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने नागपूरात आजपासून कम्युनिटी बाजार सुरू करण्यात आला आहे.
कोरोना प्रभाव: नागपुरात कम्युनिटी बाजार सुरू - महापौर संदीप जोशी
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपुरातील महात्मा फुले भाजी बाजार बंद करण्यात आला. यावर उपाय म्हणून महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने नागपूरात आजपासून कम्युनिटी बाजार सुरू करण्यात आला आहे. नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील मैदानात हा बाजार लावण्यात आला आहे.
नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातील मैदानात हा बाजार लावण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपुरातील महात्मा फुले भाजी बाजार बंद करण्यात आला. त्यानंतर शहराच्या विविध भागात असे बाजार लावण्यात आले मात्र, त्याही ठिकाणी गर्दी होत असल्याच्या तक्रारी आल्यावर असे बाजार महानगरपालिकेने बंद केले.
नागरिकांची होणारी असुविधा लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने नागपूरच्या लक्ष्मी नगर परिसरात आजपासून कम्युनिटी बाजाराची सुरवात करण्यात आली. ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर पाळण्याच्या सूचनेचे या ठिकाणी काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले. गर्दीचे नियोजन आणि नियमांचे पालन करण्यासाठी येथे स्वयंसेवक देखील नेमण्यात आले आहेत. या ठिकाणच्या बाजार यशस्वी झाल्यानंतर शहरात इतर ठिकाणी असे बाजार लावण्यात येणार आहेत.