महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nylon Manja: सावधान! नॉयलॉन मांजाची विक्री किंवा खरेदी करत असाल तर होऊ शकते कठोर कारवाई..

नागपूर पोलिसांनी गेल्या आठ दिवसात लाखो रुपयांचा नायलॉन मांजा (Nylon Manja) जप्त केला असला तरी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जराही कायद्याची भीती नसल्याने नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जातो आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांबरोबरच (Sell or buy Nylon Manja) ग्राहकांना अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. सर्व-सामान्य नागरिकांच्या मदतीने पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Nagpur City Police Commissioner Amitesh Kumar) यांनी दिली आहे.

Nylon Manja
नायलॉन मांजा जप्त

By

Published : Jan 10, 2023, 3:42 PM IST

शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार माहिती देताना

नागपूर: लहान मुलांसोबतच सर्व वयोगटातील लोकांचा आवडता उत्सव म्हणजे पतंगबाजी उत्सव सुरू झाला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पतंगबाजी सुरू झालेली आहे. मात्र,ही पतंगबाजी जेवढा आनंद देते, त्यापेक्षा अधिक दुःख,वेदना आणि त्रासदायक ठरते आहे. याचे कारण म्हणजे नायलॉन मांजा (Nylon Manja). जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना देखील छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जातो आहे. तर नॉयलॉन मांजाची विक्री किंवा खरेदी ( Sell or buy Nylon Manja) करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Nagpur City Police Commissioner Amitesh Kumar) यांनी दिली आहे.

ड्रोन कॅमेऱ्याने ठेवणार लक्ष : पतंगबाजी करताना जिथे नायलॉन मांजाचा वापर होत असेल त्या भागात ड्रोन कॅमेराच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बिट- मार्शलला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. कुठे कुठे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचा आढावा घेऊन डीलर्सवर देखील कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. याच बरोबर रेकॉर्डवरील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जागरूक नागरिक प्रमाणपत्र: नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री संदर्भात जे नागरिक पोलिसांना माहिती देतील त्यांना पोलीस विभागाकडून जागरूक नागरिक असे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

अशाप्रकारे बनवला जातो नायलॉन मांजा: मकरसंक्रांतीचा सण शहरात तसेचं ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवून साजरा करतात. या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी आणि विक्री केली जाते. हा मांजा नायलॅान धाग्यापासून तयार करण्यात येतो त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनविला जातो. त्यामुळे हा मांजा सहजा तुटत नाही व काही वर्षे तसाच टिकून राहतो.


ऑनलाइन विक्रीवर पोलिसांचे लक्ष: नायलॉन मांजाची विक्री ऑनलाइन साइट्सवर सर्रासपणे होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर नागपूर शहर पोलिसांनी सर्व ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या साईटला मेल पाठवून मांजाची विक्री करू नये असे निर्देश दिले आहेत. तसेच नागपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने नायलॉन मांजाच्या विरोधात 98 आस्थापनेची तपासणी करण्यात आली. कोणत्या दुकानात प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा विक्री केला जातं असेल तर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थी घेणार शपथ: नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका,जिल्हा परिषद तसेचं महानगरपालिकेच्या चार हजार शाळांमध्ये आज नायलॅान मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थी घेणार आहेत. जिल्हास्तरावर नायलॅान मांजा विरोधी अभियान जिल्हा प्रशासनमार्फत राबविण्यात येत आहे. ‘मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थी घेणार आहेत. यासोबतच पालकांनी आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे व नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पालकांना करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details