महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कुठल्याही घटनेला न डगमगता सामोरे जाणे हा सरन्यायाधीश शरद बोबडेंचा स्वभाव' - सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळ्या शरद अरविंद बोबडे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.  वाय वी चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे बोबडे दुसरे मराठी व्यक्ती ठरले आहेत. 23 एप्रिल 2021 पर्यंत बोबडे  सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश पद भूषवणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली

By

Published : Nov 18, 2019, 10:50 PM IST

नागपूर -सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांचा शपथविधी सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळ्या शरद अरविंद बोबडे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.

सर्वोच्च न्यायालयाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली

कुठल्याही घटनेला न डगमगता सामोरे जाणे हा शरद बोबडे यांचा स्वभाव आहे. सरन्यायाधीशपदी बोबडे यांची निवड होणे ही नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि बोबडे कुटुंबियांचे स्नेही विकास शिरपूरकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -सरन्यायाधीश बोबडे यांनी शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना....

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निकालांमध्ये न्यायाधीश शरद बोबडे यांचीमहत्वाची भूमिका राहिली आहे. अयोध्या निकालप्रक्रियेतीही ते होते. 2018मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी ते एक आहेत. वाय वी चंद्रचूड यांच्यानंतर सरन्यायाधीश होणारे बोबडे दुसरे मराठी व्यक्ती ठरले आहेत. 23 एप्रिल 2021 पर्यंत बोबडे सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश पद भूषवणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details