महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण... अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना

'माय-महानगर' नावाच्या वेबसाईटवर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. सध्या कोरोना संदर्भांत प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित वेबसाईटवर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा, कारवाईचे आदेश
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा, कारवाईचे आदेश

By

Published : Mar 13, 2020, 6:15 PM IST

नागपूर - नागपुरात एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सर्व स्तरावर उपाय-योजना करण्यात व्यस्त आहेत. यातच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाच कोरोना झाल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरवली जात आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित वेबसाईटवर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा, कारवाईचे आदेश

नागपूर शहरात कोरोना वायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ३ झाली आहे. पहिला रुग्ण पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी ठाकरे यांनी शहरातील जीएमसी आणि आयजीएमसी रुग्णालयात कोरोना रुग्णांची व्यवस्था चोख व्हावी आणि शहरातून या रोगाचे उच्चटन व्हावे या करिता उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान 'माय-महानगर' नावाच्या वेबसाईटवर अमेरिका रिर्टन नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित करण्यात आले. सध्या कोरोना संदर्भांत प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.

हेही वाचा -कोरोना व्हायरस: नागपुरातील 'त्या' व्यक्तीच्या दोन नातेवाईकांनाही लागण

त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शेकडो फोन येत असल्याने ते पुरते वैतागून गेले आहेत. ज्या वेबसाईटने कोणतीही शहानिशा न करता असे वृत्त प्रसारित केले, त्यावर कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा -तलवार घेऊन वस्तीत दहशत निर्माण करण्याचा गुंडाचा प्रयत्न; पोलिसांनी केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details