महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शनिवारी शाळांना सुट्टी, पंतप्रधानांचा दौराही रद्द

प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा शनिवारी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत. तर, प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने ७ सप्टेंबरचा पंतप्रधानांचा नागपूर दौराही रद्द करण्यात आला आहे.

अतिवृष्टी

By

Published : Sep 6, 2019, 11:41 PM IST

नागपूर - शुक्रवारी नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर शनिवारीसुद्धा नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उद्या नागपूर शहरातील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, शनिवारी ७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित नागपूर दौराही स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्या शाळांना सुट्टी जाहीर
प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा शनिवारी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत.आज शुक्रवारी नागपूरला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले होते. सुदैवाने शुक्रवारी महालक्ष्मी पुजनाची सुट्टी असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. मात्र, शनिवारीसुद्धा अतिवृष्टीचा धोका असल्याने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज


यातच हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७ सप्टेंबर रोजीचा नियोजित दौराही सद्यपरिस्थितीत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details