नागपूर -आमचे सरकार आल्यावर विरोधक विचारतात शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वचनबद्ध आहोत. मात्र, तुम्हाला अच्छे दिन बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी वळते, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शहर आणि ग्रामीण शिवसेनेकडून त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, सरकार चालवण्याच आव्हान मोठे आहे आणि म्हणूनच हे आव्हान घेतले. आम्ही कालही हिंदू होतो आजही हिंदू आहोत आणि उद्याही हिंदूच राहू, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीबद्दल बोलताना ते म्हणाले, वेगवेगळ्या विचारांचे तिन पक्षांचे सरकार हे मोठे आवाहन होते. मात्र, हे आवाहन पेलू शकलो नसतो तर बाळासाहेबांचा पुत्र म्हणून जगू शकलो नसतो. राज्यात बऱ्याच समस्य़ा आहेत. गेल्या सरकारमध्ये अर्धेमुर्दे होतो. मात्र, प्रश्न सोडवण्यासाठी सरकार म्हणून काम करणार आहोत. मुख्यमंत्री म्हणून नाही तर कुंटुंबप्रमुख तुमच्यासमोर आलो आहे. लोकांचा आशिर्वाद घेवून करायचं नागपूरसह संपूर्ण विदर्भ भगवा करायचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा -हिवाळी अधिवेशन : राहुल गांधीचे नाव घेताच बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग
तर आता सरकारमध्ये जबाबदारीने वागू, वेडे वाकडे करून चालणार नाही. बाळासाहेंबानी जनतेशी नेहमी नम्र राहण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये फरक समजला पाहीजे, हे सरकार जनतेला आपले सरकार वाटले पाहिचे, असे काम करून दाखवणार आहे. भाजप-सेनेच्या युतीबद्दल बोलताना ते म्हणाले, पाकिस्तान, बांग्लादेश मिळून अखंड हिंदूस्थान करण्यासाठी युती झाली होती. ही भूमिका सावकरांची होती. आमचेही स्वप्न तेच आहे. तसेच मी वचनाचा पक्का असल्याने कर्जमुक्ती करणारच, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
हेही वाचा -'मोदी-शाह पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारतातील हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का?'
नोटबंदी नंतर ५० दिवस द्या त्यानंतर किती दिवस दिले, अजूनही ५० चा पाढा सुरू आहे. मोदींनी वेगळं काहीच केलं नाही. तसेच निर्वासीतांना कुठे नेणार, किती जण येणार आहेत. त्याची आकडेवारी सरकारकडे नाही, असेही सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टिका केली. काश्मिरी पंडीताना हक्काचं घर शिवसेना प्रमुखांनी मिळवून दिलं.
बाहेरून येणाऱ्या हिंदुना देशात घेणार आहात. मात्र, बेळगाव मधील मराठी माणसांना महाराष्ट्रात का घेत नाही? बेळगाव कारवार निपाणीतील मराठी माणसांना महाराष्ट्रा यायचे आहे. तिथे त्यांच्यावर भाषिक अत्याचार होत आहे. देशात तुमचे सरकार असतानाही तुम्ही त्यांची किती दखल घेतली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेची ओळख ठाम आहे. आम्ही कोणत्याही बुरखा घातला नाही.
देशात आज इतक्या समस्या आहेत. कांदा महागतोय त्याला उत्तर काही नाही. मात्र, नागरिकता कायद्याला विरोध केल्यावर देशद्रोही म्हटले जाते. विरोध केला म्हणून पाकिस्तानची भाषा बोलतात, असे पंतप्रधान बोलतात. मग पाकिस्तानलाच का संपवत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.