नागपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या माझी मेट्रोच्या अॅक्वा लाईनच्या ११ किमी मार्गाचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडिओ लिंक द्वारे या मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीपसिंग पुरी उपस्तीत राहणार आहेत.
गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या अॅक्वा लाईनचे उद्घाटन होणार होते. मात्र, त्यावेळी सलग ४ दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून सलग ४ महिने उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या माझी मेट्रोच्या अॅक्वा लाईनच्या उदघाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे. २८ जानेवारीला हा मुहूर्त साधण्यात येणार आहे.