नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या जैवविविधता उद्यानाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. वसुंधरेचे कर्ज फेडण्यासाठी प्रत्येकाने हरित मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन वनमंत्र्यांनी यावेळी केले.
नागपुरातील अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण; १८०० एकरवर उभारला प्रकल्प - हरित मोहिमेत
नागपुरात १८०० एकरवर उभारण्यात आलेला जैवविविधता पार्कचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १५ गवताच्या प्रजाती, ४५० वनस्पती, शंभर हरीण, १६१ पक्षी, १६ प्रजातीचे मासे आणि १०४ प्रजातीची फुलपाखरे आहेत. जैवविविधता असलेला हा पार्क नागपूर आणि संपूर्ण भारतासाठी पर्यटनाचा केंद्र ठरणार आहे.
नागपुरातील हे जैवविविधता उद्यान १८०० एकरवर उभारण्यात आले आहे. ठिकाणी १५ गवताच्या प्रजाती, ४५० वनस्पती, शंभर हरीण, १६१ पक्षी, १६ प्रजातीचे मासे आणि १०४ प्रजातीची फुलपाखरे आहेत. जैवविविधता असलेला हा पार्क नागपूर आणि संपूर्ण भारतासाठी पर्यटनाचा केंद्र ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, बायोडायव्हर्सिटी पार्कचे भूमिपूजन केल्यानंतर त्याचे लोकार्पण करण्याची संधी मिळेलच याची शास्वती नसते. कारण तो तयार होतपर्यंत मुख्यमंत्री टिकत नाही. मात्र मी टिकलो आणि भूमिपूजनासोबत लोकार्पण सुद्धा मीच केले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जैवविविधतेचे महत्व सांगत सुधीर मुनगंटीवार यांच्या वृक्षलागवडीला विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा मोठा सहभाग मिळत आहे. तसेच युवा पिढी वृक्षप्रेमी असून त्याचा फायदा भविष्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी काही क्षण या सफारीचा आनंद सुद्धा घेतला. हा प्रकल्प नागपूरकरांसाठी एक पर्यटनाचा केंद्र ठरणार आहे. एखाद्या वेळी बँकेचे कर्ज फेडले नाही तर मुख्यमंत्री कर्जमुक्ती योजनेतून ते माफ होईल. पण वसुंधरेचे कर्ज प्रत्येकाला जबाबदारीने फेडावेच लागेल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.