नागपूर - फक्त नक्षलग्रस्त साहित्य बाळगले म्हणून तुम्हाला अटक करण्याचा प्रश्नच नाही. तस करायच असेल तर मलाही अटक करावी लागेल, कारण मी स्वतः सगळं वाचलं आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रेमानंद गजवी यांनी केलेल्या टिकला उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजवी यांनी काल (शुक्रवार) आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मी उद्या नक्षलग्रस्त साहित्य बाळगलं म्हणून मलाही अटक करणार का? असा सवाल विचारला होता, त्यावर मुखमत्र्यांनी हे स्पष्ट दिल आहे. देशविघातक कार्य काही प्रवृत्तीकडून होत असेल तर त्यांना थांबवण्याची जबाबदारी आपल्यावर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाने निश्चित केली आहे. ती पार पाडणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिव्यक्तीवर नेहमी चर्चा होत रहावी, या देशाच्या रक्तात सहिष्णुता आहे. या देशात १९७७ मध्येच अभिव्यक्तीवर स्वातंत्र्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी लोकांनी ती सत्ता उलथवून टाकली होती. त्यामुळे अभिव्यक्तीवर काळजी करायची गरज नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, येत्या काळात नागपुरात नाट्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव आहे.मराठी रंगभूमी समृद्ध ठेवल्याबद्दल ते मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांचे आभार मानले. तुमच्याकडे कोणतेही नक्षली साहित्य सापडले तर तुम्हाला अटक करणार नाही. तस झाले तर मी ही सगळ वाचलंय मलाच अटक करावी लागेल. तुम्ही कोणताही गैरसमज करून घेऊ नका. मात्र या देशाच राज्यच संरक्षण करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यामातून आम्हाला घालून दिली आहे. ती जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत.
यासोबत नाट्यकर्मींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्याबाबत व्यक्त केलेली भीती रास्त असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याबद्दल चर्चा करून तोडगा निघायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 99 व्या नाटय संमेलनासाठी मुंबईहून आलेल्या कलाकाराचं स्वागत करताना सामाजिक प्रबोधन करण्याची मोठ कार्य मराठी रंगभूमीने केले असल्याचे सांगितले. त्यांनी मराठी लेखक, नाटककार आणि रंगकर्मीचे आभार मानले. त्यासोबतच 100 व्या नाटय संमेलन नागपुरात घ्यावे, असे म्हणत त्यांनी नाटय परिषदेला तशी जाहीर विनंती केली.