महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भात आणि राज्यात महायुतीला अभुतपुर्व यश मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - assembly election nagpur 2019

नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 4, 2019, 1:55 PM IST

नागपूर - संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचा दावा केला आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या कामाच्या जोरावर मला जनतेचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. या आशिर्वादाचे पाठबळ आमच्या पाठीशी उभे राहील आणि मोठा विजय आम्हाला प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल

तसेच राज्यात महायुतीची मोठी लहर असून लोकांना भाजपवर प्रचंड विश्वास असल्यानेच राज्यात युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

हेही वाचा - दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अर्ज दाखल, मानमोडेमुळे डोकेदुखी

ABOUT THE AUTHOR

...view details