महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांकडून लोकसभा मतदारसंघांची घोषणा; मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया - अजित पवार गट शिबिर

CM Eknath Shinde : अजित पवार यांनी आपल्या गटासाठी लोकसभेच्या चार मतदारसंघांची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. बारामती, शिरुर, सातारा, रायगड अशा चार लोकसभा मतदारसंघात आपण लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 6:41 PM IST

नागपूर CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं शिबीर (Ajit Pawar Group) पार पडले. त्यात अजित पवारांनी भाषण करताना शरद पवारांवर टीका (Ajit Pawar on Sharad Pawar) केली. एवढंच नाही तर त्यांनी चार लोकसभा जागांची घोषणा (Ajit Pawar Loksabha Seats) देखील केली. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EknathShinde) यांनी सावध प्रतिक्रिया दिली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका या तिन्ही पक्ष मिळून अत्यंत मजबुतीनं लढणार आहोत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील राज्यातून नरेंद्र मोदी यांना ४५पेक्षा अधिक जागा लोकसभेच्या जिंकून देणार आहोत, असं ते म्हणाले.

अजित पवारांच्या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया : एकजूट आणि सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत, अशा प्रकारचं भाष्य अजित पवारांनी केलं असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. आगामी प्रत्येक निवडणुका या महायुती लढवेल, २०२४ च्या विधानसभा निवडणुका देखील महायुती पूर्ण ताकदीनं लढवणार आहे. दीड वर्षात आमच्या सरकारनं घेतलेले निर्णय, केलेलं काम, सर्वसामान्यांना दिलेला न्याय, या निवडणुकीत त्याची लोक पावती देतील आणि महायुती पूर्ण ताकदीने जिंकेल, अशी माहिती त्यांनी दिली.

नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू :अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीबद्दल कॅबिनेटच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळं तत्काळ नुकसानग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पंचनामे युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झालाय. एकत्रित पंचनामे, संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अडचणीत आलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभं आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही भूमिका आमच्या सरकारनं वारंवार घेतली आहे, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा -

  1. अनिल देशमुखांबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट; गाफील ठेवल्याचाही केला आरोप
  2. शरद पवारांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपानं अजित पवारांना सुपारी दिली; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
  3. काहीजण पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'

ABOUT THE AUTHOR

...view details