महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार प्रिय म्हणून रेशीमबागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही: मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२२

CM Eknath Shinde: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या Maharashtra Assembly Winter Session 2022 अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचे विचार प्रिय म्हणून रेशीम बागेत गेलो, गोविंद बागेत गेलो नाही, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. CM Eknath Shinde Criticized Opposition

CM Eknath Shinde Criticized Opposition in Last Day speech at Maharashtra Assembly Winter Session 2022
बाळासाहेबांचे विचार प्रिय म्हणून रेशीम बागेत गेलो, गोविंद बागेत गेलो नाही: मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By

Published : Dec 30, 2022, 4:33 PM IST

Updated : Dec 30, 2022, 5:27 PM IST

मुंबई : नागपूरात हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2022) आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अंतिम आठवडाच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी तोफ डागली आहे.

मुख्यमंत्र्यांनी भाषणा दरम्यान केली टीका : आम्ही इतके चांगले निर्णय घेत असताना देखील विरोधकांनी कोतुक करण्याच्या ऐवजी आमच्यावर टीका केल्या जातात. सध्या जपान आणि चीनमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी सरकार बदलले नसते तर नागपूरात अधिवेशन झालेच नसते. गेल्या अडीच वर्षात करोनाच्या स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत गेले होते. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना दिली आणि विकास कामांना सुरूवात केली. शेतकऱ्यांना काय पाहिजे आम्हाला कळले आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून राज्यात शेतकऱ्यांना काही मागायची गरज लागली नाही.

विधिमंडळ अधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • अडीच वर्षात केवळ एका सिंचन प्रकल्पाला मान्यता
  • गेल्या सहा महिन्यात 18 सिंचन प्रकल्पांना मान्यता
  • अडीच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
  • अठरा हजार कोटीचा प्रकल्पांना मंजुरी
  • माणूस चुकतो तेव्हा तो भविष्यात चुकत नाही
  • पन्नास माणसं कशी चुकू शकतात
  • एक माणूस बरा बाकीचे 50 चुकीचे असे होणार नाही
  • तुम्ही काळजी घेताय चांगली बाब अजित पवार यांना टोला
  • बाळासाहेबांनी प्रबोधनकर यांच्या विचारांना तिलांजली दिली
  • या सगळ्या बाबतीत चूक कोणाची हे ठरवा
  • बाळासाहेबांच्या विचार प्रिय म्हणून रेशीम बागेत गेलो गोविंद बागेत गेलो नाही
  • सहन करायची एक मर्यादा असते कोणावर आरोप करतात ज्याला सगळी अंडी पिल्ले माहित आहे
  • जे घरातून बाहेर पडत नाहीत त्यांनी हिंमत भाव दाखवण्याची भाषा करावी हा मोठा विनोद
Last Updated : Dec 30, 2022, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details