नागपूर:महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ महावितरण (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. महावितरण केवळ देखभाल किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी हा संदेश पाठवला जाते. त्यामुळे ग्राहकांनी बनावट ‘एसएमएस’वर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
उमरेड येथील जीवन विकास शाळेचे पदाधिकारी प्रशांत सपाटे यांना ४ मे रोजी मोबाईलवर मेसेज आला त्यात वीज बिल न भरल्यामुळे तुमचा वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी १०.३० नंतर खंडित करण्यात येइल असे सांगण्यात आले. पण वेळीच लक्षात आल्याने माहिती न देता सतर्क राहिल्याने आर्थिक नुकसान टळले. या प्रकरणी महावितरणच्या उमरेड विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी उमरेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.