नागपूर- मोमीनपुरा परिसरातील सगळ्यात मोठी बकरा मंडी वाठोडा परिसरात स्थानांतरित करण्यात आली. मात्र वाठोडा परिसरातील नागरिकांनी बकरा मंडीला तीव्र विरोध केला आहे.
कोरोनाच्या दहशतीमुळे बकरा मंडी स्थानांतरित; निर्णयाला वाठोड्यातील नागरिकांचा विरोध - mominpura market
मोमीनपुरा येथील बकरा मंडी वाठोडा येथे हलविण्यात आली असल्याने या परिसरातील नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे.

मध्य नागपुरातील मोमीनपुरा हा मुस्लिम बहुल परिसर कोरोनाचे सर्वात मोठा हॉटस्पॉट असल्याने या भागाला कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे इथले सर्व उद्योग धंदे बंद करण्यात आले असल्यामुळे नागपुरातील सर्वात मोठी बकरा मंडी पूर्व नागपुर परिसरातील सिम्बॉयसिस कॉलेजच्या शेजारी असलेल्या रिकाम्या मैदानात स्थानांतरित करण्यात आली आहे.
मोमीनपुरा येथील बकरा मंडी वाठोडा येथे हलविण्यात आली असल्याने या परिसरातील नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण झाली आहे. आधीच सिम्बॉयसिसमध्ये कोरोनासाठी क्वारंटाइन सेंटर बनविण्यात आले आहे. याठिकाणी 600 च्या जवळपास नागरिक आहे. बाजूलाच बकरी मंडी भरविण्याला नागरिकांनी विरोध केला आहे.