नागपूर- ज्या दिवसाची नागपूरकर मोठ्या आतुरतेने वाट बघत होते, तो मेट्रो प्रवासाचा दिवस नागपूरकरांनी आज अनुभवला. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरच्या 'माझी मेट्रो'चे उद्घाटन झाले. त्यानंतर आज नागपुरकरांना अभिवादन करण्यासाठी मेट्रोचा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला होता.
नागपूरकरांनी अनुभवला 'माझी मेट्रो'चा सुखद प्रवास - FADNVIS
नागपूरकरांनी अनुभवला मेट्रोचा सुखद प्रवास... पहिल्या दिवशी मोफत सेवा देऊन माझी मेट्रोचे नागपूर वासियांना अभिवादन... प्रवाशांकडून नागपुरातील पहिलाच मेट्रो प्रवास मोबाईलमध्ये कैद
संत्रानगरी नागपुरातील रहिवाशांनी आज सकाळी ९ वाजता सीताबर्डी एक्सचेंज या मेट्रो स्टेशनपासून ते खापरी स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास अनुभवला. माझी मेट्रोचा पहिला दिवस असल्याने यावेळी नागपूरकरांमध्ये प्रंचड उत्साह दिसून आला.
नागपूरकरांनी मोठ्या उत्साहाने माझी मेट्रोचे स्वागत केले. आज सकाळपासूनच नागपूरकर माझी मेट्रोतून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी सीताबर्डी एक्सचेंज स्टेशनवर दाखल होत आहेत. यावेळी नागपूरकरांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत आला. सर्वांनी हा अनुभव आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तर अनेकांनी मेट्रोसोबत सेल्फीही काढल्या.