नागपूर - सत्ता स्थापनेवरून झालेल्या गदारोळानंतर राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटी दरम्यान नागपूर येथील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यालय बंद करण्यात आले होते. त्यामुळे विदर्भातील गरीब रुग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. 'ईटीव्ही भारत'सह प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिल्यानंतर सहायता निधी कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
नागपुरातील 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष' पुन्हा सुरू - नागपूर वैद्यकीय सुविधा बातमी
सत्ता संघर्षामुळे कार्यालय बंद पडले होते. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होऊ लागली होती. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा-IPL Auction २०२० : लिलावाला सुरूवात, मुंबईच्या संघात हा धडाकेबाज फलंदाज
सत्ता संघर्षामुळे कार्यालय बंद पडले होते. त्यामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होऊ लागली होती. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातील वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यालयात इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय (मेयो) चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनपुरे हे काम पाहणार आहेत. या शिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील व ही समिती त्या रुग्णांना देण्यात येणारे अर्थसहाय्य विहीत निकषानुसार निश्चित करणार आहे.