नागपूर - महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा रेल्वे स्थानकावर संशयास्पद मृत्यू झाला. 52 वर्षीय दिलीप घुगल यांचा रेल्वे स्थानकावरील बाहेरील भागात मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. घुगल यांचा मृत्यू अपघाती होता की, आत्महत्या या बाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
अभियंता दिलीप घुगल हे नागपूरच्या मध्य रेल्वे स्थानकावर शासकीय वाहनाने गेले होते. चालकाला पार्किंगमध्ये थांबण्याचे निर्देश देऊन ते आपल्या नातेवाईकाला घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मुंबईच्या बाजूने असलेल्या रल्वे मार्गावरील मालगाडीखाली ते सापडले. याबाबत माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली.