नागपूर -उत्तर भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असलेली छठ पूजा उत्सव नागपुरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. छठ पूजेसाठी नागपूर शहरातील अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे व्यवस्था करण्यात येत आहे. छठ पूजा उत्सवाच्या निमित्त मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात. त्यादृष्टीने तयारी करण्यात येते.
नागपुरमध्ये छट पूजा! फुटाळा तलाव येथे पूजेची व्यवस्था - Pooja arrangement at Futala lake
उत्तर भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असलेली छठ पूजा उत्सव नागपुरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. छठ पूजेसाठी नागपूर शहरातील अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे व्यवस्था करण्यात येत आहे. छठ पूजा उत्सवाच्या निमित्त मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात.
भाविकांना त्रास होऊ नये - यावर्षी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी छठ पूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवा निमित्त करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची पाहणी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने येथून भाविक सूर्य देवताला अर्ध्य देतात. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याची काळजी मनपाच्या वतीने घेण्यात येईल.
स्वच्छतेला झाली सुरुवात- पावसामुळे अंबाझरी तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. गवत कापण्यात यावे,बर्रीकॅडींग करण्यात यावे, विद्युत व्यवस्था करण्यात यावी तसेच साऊंडची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले. भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी तलावापर्यंत येण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.