नागपूर Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. यावेळी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला पुन्हा एकदा मुदत दिली असून, आरक्षण मिळायलाच हवे, अशी ठाम भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच नव्हे तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीवर खंजीर खुपसला, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे ही सर्वपक्षीय भूमिका आहे. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते तर : २०१९ साली देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत मिळाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते तर, मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टातही टिकवून ठेवले असते. मराठा समाजाला न्याय मिळवून दिला असता. कोणत्याही व्यक्तीने दोन समाजांना एकमेकाच्या समोर आणण्याचे वक्तव्य करू नये, असंही बावनकुळे म्हणाले.