महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule : जशी कैद्यांची भाषा तशी संजय राऊतांची भाषा - चंद्रशेखर बावनकुळे - जशी कैद्यांची भाषा तशी संजय राऊतांची भाषा

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आज टिकाशस्त्र (Chandrashekhar Bawankule Criticized MP Sanjay Raut) सोडलं. तर भाजपच्या नेत्यांनी महापुरुषां बाबत केलेले वक्तव्य हे मुद्दाम केलेले नाहीत. असे सांगत त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची देखील पाठराखन केली.

Bawankule Criticized MP Raut
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Dec 8, 2022, 12:18 PM IST

नागपूर :शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले असेल, तर त्यांनी पोलिसांचे संरक्षण मागावे. पोलीस तक्रार करावी. मात्र ते मीडियासमोर येऊन बोलत आहेत. त्यांनी संरक्षण मागितले तर, देवेंद्र फडणवीस संरक्षण देण्यात सक्षम आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule Criticized MP Sanjay Raut) यांनी केले. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.

वाहियात बोलणं टाळावं :संजय राऊत नेत्यांना शिव्या शाप देतात, राऊत यांनी आता वाहियात बोलणं टाळावं. ते तीन महिने जेलमध्ये राहून आले आहे, त्यामुळे कैद्यांची जशी भाषा असते तशीचं भाषा ते वापरतात. संजय राऊतांनी विधायक काम केलं पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी राऊत यांना लगावला आहे.


मग इतरांचं काय : प्रसाद लाड यांना कोकण छत्रपतींची कर्मभूमी सांगायचं होतं, मात्र ते थोडं चुकले. लोढा यांनी छत्रपतीची तुलना मुख्यमंत्र्यांशी नाही करायला पाहिजे होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शिवनेरीला या वयात ही पायी गेलेले आहे. मात्र बोलतांना त्यांचं चुकलं असल्याचं ते म्हणाले आहेत. याबद्दल आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात असताना, वीस वेळेला स्वातंत्र्यवीरांचा अपमान केला आणि त्याच वेळेस कर्मवीर आदित्य ठाकरे राहुल गांधींची गळाभेट घेत होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत 20 उदाहरण देता येईल, जेव्हा यांनी महापुरुषांचे अपमान केले. मात्र मला त्यात जायचे नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details