महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझ्यावर पक्षश्रेष्ठींचा कोणताही राग नाही -बावनकुळे - maharastra assembly election 2019

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे बावनकुळे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे.

बावनकुळे

By

Published : Oct 4, 2019, 7:05 PM IST

नागपूर- साऱ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे बावनकुळे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बावनकुळे सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत. 'पक्षाचा निर्णय मान्य करावा,' असा सल्ला बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

हेही वाचा-राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?

या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, 'पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर कोणताच राग नाही. पूर्व विदर्भातील उमेदवारांना जिंकून आणण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली. त्यामुळे मला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पत्नी ज्योतीच्या उमेदवारी संदर्भात मीच नकार दिला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details