नागपूर:माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आजपासून नाशिक आणि पुणे जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे इव्हेंट मॅनेजमेंट करतात, त्यांचा आजचा दौऱ्या त्याचाचं भाग आहे. ते पेंग्विन सेनेला सोबत घेऊन टिव-टिव करत आल्याची घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे.
Chandrashekhar Bawankule : आदित्य ठाकरे पेंग्विन सेनेला सोबत घेऊन टिवटिव करतात; बावनकुळेंची टीका - पुणे जिल्हाच्या दौऱ्यावर
Chandrasekhar Bawankule On Aditya Thackeray: माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आजपासून नाशिक आणि पुणे जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरे इव्हेंट मॅनेजमेंट करतात, त्यांचा आजचा दौऱ्या त्याचाचं भाग आहे. ते पेंग्विन सेनेला सोबत घेऊन टिव-टिव करत आल्याची घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे.
आमचे सरकार कोसळणार नाही:आदित्य ठाकरे जेव्हा सरकार मध्ये होते. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी होती, पण त्यांनी संधीची माती केली असं देखील बावनकुळे म्हणाले आहे. आमच्या सरकारने एनडीआरएफ नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही मदत केली. सरकार चालविणे त्यांच्या बसचा रोग नाही असं ते म्हणाले आहे. सत्ता होती तेव्हा, फेसबुक लाईव्ह न करता राज्यात फिरले असते. तर सरकार गेली नसती, अशी टीका त्यांनी केली आहे. आमचे सरकार कोसळणार नाही. आमदार फुटावे यासाठी सभ्रम निर्माण केला जातं आहे. भाजपकडे त्यांचे कार्यकर्ते येत असल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
केजरीवाल यांची मागणी नौटंकी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी म्हणजे नौटंकी आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. असं केल्यानं त्यांना हिंदू मत मिळतील. अशी आशा केजरीवाल यांना आहे. गुजरात आणि इतर राज्यात हिंदुत्ववादी मतावर डोळा आहे. या आधी हिंदू विरोधी भूमिका त्यांनी घेतली, असा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक हिंदू देवी देवांचे फोटो नोटात आणण्याची मागणी केली आहे. आता दिल्लीत लोक त्यांना कंटाळले असल्याचे वक्तव्य त्यांनी केले जात आहे.